कोकणदर्शनमधून करूया संगमेश्वरची सफर; २२ मे रोजी प्रसारण

रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर प्रसारित होणाऱ्या कोकण दर्शन या कार्यक्रमातून संगमेश्वरची सफर श्रोत्यांना घडणार आहे. २२ मे रोजी या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.
आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून पर्यटनावर आधारीत कोकण दर्शन हा कार्यक्रम दर शुक्रवारी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी प्रसारित होतो. यावेळी या कार्यक्रमात संगमेश्वर तालुक्यातील धार्मिक स्थळे याविषयीची माहिती आणि तिथली संगमेश्वरी बोली याचा आनंद श्रोत्यांना घेता येणार आहे.


या कार्यक्रमाचं लेखन सोनाली सावंत यांनी केले असून निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनली सावंत आणि वंदना मुसळे यांचे आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत. श्रोत्यांना हा कार्यक्रम ११४३ Khz या मध्यमलहरी वाहिनीवर आणि १०१.५ Mhz या एफ. एम. वाहिनीवर तसंच newsonair या लाईव्ह मोबाईल अँपवर ऐकता येईल. प्रसारण झाल्यानंतर हा कार्यक्रम airratnagiri या यू ट्यूब चॅनलवर ही उपलब्ध होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button