औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in वर 21 मे पर्यंत अर्ज करावेत



रत्नागिरी, दि. 18 ) : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन दिनांक 21 मे पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी गटनिदेशक एस. एन. पोकडे मो. नं. 9422966044, शिल्पनिदेशक, एम. एम. दळी, मो. नं. 9970432742, शिल्पनिदेशक, एस. एम. वेतोस्कर, मो.नं. 9970432742 यांना संपर्क साधावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) प्राचार्यांनी केली आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची रत्नागिरी येथे कॉस्मेटॉलॉजी, फुटस अॅण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, ड्रेस मेकिंग, स्युईंग टेक्नॉलॉजी, काम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट, इंफॉरमेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स हे व्यवसाय शिकविले जातात. व्यवसायाची प्रवेश क्षमता अनुक्रमे कॉस्मेटॉलॉजी – 24, फुटस अॅण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग- 24, ड्रेस मेकिंग- 20, स्युइंग टेक्नॉलॉजी -20, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट – 24, इंफॉरमेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स आहे. यामध्ये ड्रेस मेकिंग, स्युईंग टेक्नॉलॉजी करिता शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण आहे व इतर सर्व दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. तसेच व्यवसायाचा कालावधी इंफॉरमेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेंटेनन्स या व्यवसायाकरिता 2 वर्षाचा आहे व इतर सर्व व्यवसायांकरिता 1 वर्षाचा कालावधी आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपध्दतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते. आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतन वाढ करण्यात आलेली आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तरी व्यावसायिक शिक्षण पूर्ण करुन त्वरित रोजगार स्वंयरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावे, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button