
ओबीसी नॉन क्रिमेलिअरची मर्यादा थेट 15 लाखांवर ! 43 नव्या जातींच्या समावेशाची शिफारस!!
मुंबई– गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ओबीसी आरक्षण तसेच ओबीसी प्रवर्गात मोडणाऱ्या वेगवेगल्या जातींच्या अनेक समस्यांविषयी बोलले जात आहे. सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे.
या सर्व मागण्यांवर ओबीसी आरक्षणविषयक उपसमिती गांभीर्याने काम करत आहे (19 मे) ओबीसी आरक्षणिषयक उपसमितीची बैठक झाली. या बैठकीच्याअध्यक्षस्थानी उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे होते यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे उपसमितीने ओबीसींसाठी नॉन क्रिमेलियरची मर्यादा थेट 15 लाख रुपये करावी, अशी शिफारस करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ओबीसीमध्ये आणखी 43 नव्या जातींचा समावेश करावा, अशीही शिफारस या उपसमितीने केली आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे.




