एस.टी. बस व डंपरच्या धडकेमुळेनिगडे गावची स्वागत कमान कोसळली


दापोली-दाभोळ मार्गावरील निगडे फाटा येथे रविवार दि. 17 मे रोजी रस्त्यावरून प्रवास करणारी एसटी बस आणि डंपर एकमेकांना साईड देत असताना, निगडे गावाच्या स्वागत कमानीला दोन्ही वाहनांची जोरदार धडक बसली. या भीषण धडकेमुळे ही अजस्त्र स्वागत कमान थेट रस्त्यावर कोसळली. 24 तास उलटूनही कमानीचा मोठा मलबा अजूनही रस्त्यावरच पडून असल्याने परिसरातील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निगडे फाटयावरून गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मुख्य प्रवेशव्दारावर ही स्वागत कमान उभारण्यात आली होती. दि. 17 मे रोजी या मार्गावरून जात असताना एसटी बस आणि डंपर यांच्यात साईड काढण्यावरून ताळमेळ बिघडला. दोन्ही वाहनांची बाजू काढत असताना त्यांचा अंदाज चुकला आणि थेट स्वागत कमानीला भीषण धडक बसली. धडक एवढी तीव्र होती की सिमेंट-काँक्रीटची ही भक्कम कमान पूर्णपणे पत्त्यासारखी कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button