सिंधुदुर्ग जिल्ह्यात जखमी झालेला बिबट्या थेट स्वयपांक घरात


सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-कोऱ्याचीवाडी येथील बागायतदार विवेक जोशी यांच्या स्वयंपाकघरात चक्क एक जखमी बिबट्या शिरला. त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करून त्याच्यावर उपचार करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून दाभोली-कोऱ्याचीवाडी परिसरात हा बिबट्या नागरिकांना दिसत होता. जोशी यांना सकाळी तो आपल्या बागेत दिसला. काही वेळाने तो गोठ्यात आला. त्याला हाकलण्याचा प्रयत्न करताच तो थेट स्वयंपाकघरात घुसला. बिबट्या जखमी व अशक्त असल्याने तो तिथेच बसून राहिला. जोशी कुटुंबीयांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला.

सहायक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळचे वनक्षेत्रपाल संदीप कुंभार व पथक, कुडाळ येथील जलद बचाव पथक यांनी बिबट्याला जेरबंद केले. बिबट्यावर तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. शरद जाधव, डॉ. सागर चव्हाण, डॉ. राजश्री जाधव यांनी उपचार केले.

कुंपणाची तार लागून जखमी

डॉक्टरांच्या माहितीनुसार, हा बिबट्या दोन वर्षांची मादी असून, काटेरी कुंपणातून रस्ता ओलांडताना त्याच्या मानेच्या मागील बाजूस जखम झाली होती. ती जखम चिघळल्याने व अशक्तपणा आल्याने तो मानवी वस्तीकडे वळली. पुढील तीन दिवस त्याला वनविभागाच्या निरीक्षणाखाली ठेवून प्रकृतीत सुधारणा झाल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button