
संगमेश्वर-फुणगूस मार्गावर गॅस पाईपलाईन खोदाईमुळे जनजीवन विस्कळीत
संगमेश्वर-फुणगूस मार्गावर गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी सुरू असलेल्या बेसुमार खोदाईमुळे असुर्डे परिसरातील सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि स्थानिक ग्रामपंचायतीना विश्वासात न घेता काम सुरू आहे. अंतर्गत रस्ते रात्रीच्यावेळी अचानक बंद केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर मोठ्या यंत्रसामग्रीद्वारे खोदाई सुरू आहे. विशेष म्हणजे हे काम रात्रीच्यावेळी अधिक वेगाने केले जात असल्याने सकाळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दापोली शहरालगत असलेल्या खेर्डी गावातून जाणार्या मुंबई रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या सहनशक्तीचा बांध अखेर शनिवारी फुटला. सार्वजनिक बांधकाम विभागासह तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या निष्क्रिय आणि ढिसाळ कारभारावर नारिकांनी श्रमदानातून जोरदार चपराक दिली. अनेकवेळा तक्रारी करूनही संबंधित अधिकार्यांनी कानाडोळा केल्यामुळे संतप्त नागरिकांनी स्वतःच रस्त्यावर उतरून खड्डे बुजवले.www.konkantoday.com




