श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा चांगभलंच्या गजरात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली


महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा बुधवारी जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.दुपारच्या सुमारास पावसाला सुरुवात होऊन देखील भाविकांची डोंगरावर मोठी गर्दी होती.

गगनचुंबी सासनकाठ्यांचा भार खांद्यावर पेलताना हलगीच्या तालावर होणारे लयबद्ध नृत्य, गुलाल खोबऱ्याची उधळण, मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन, सायंकाळी यमाईचा विवाह, जोतिबा देवाची पालखी.. देवाला सलामी देण्यासाठी वरुणराजाची हजेरी, एकीकडे गडगडाटात कोसळणाऱ्या पाऊसधारा आणि दुसरीकडे भक्तीचा महापूर असा हा अलौकिक सोहळा रंगला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button