
वेळंब नालेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
गुहागर तालुक्यातील वेळंब नालेवाडी येथील श्री हनुमान मंदिर येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सत्यनारायणाची महापूजा, रात्री ९.३० वा. स्थानिक भजने, १०. वा. श्री हनुमान प्रासादिक नाट्य मंडळ मुंबई निर्मित हृदयस्पर्शी, कौटुंबिक जिव्हाळ्याचे ३ अंकी नाटक “त्याग”. २ एप्रिल रोजी पहाटे ५.३० वा. श्री हनुमान जन्मोत्सव व दिंडी सोहळा, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, दुपारी ३ वा. स्थानिक महिला मंडळाचे हळदीकुंकू, रात्री ९.३० वा. स्थानिक भजने
रात्री १०. वा. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष, वेळंब नालेवाडी ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे.




