वीज वाहिनीला डंपरचा स्पर्श चालकाचा जागीच मृत्यू


दापोली -मंडणगड रस्त्यानजिक मंगळवार दि. 31 मार्च रोजी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माती वाहतूक करणाऱ्या डंपरचा थेट वीज वाहिनीशी संपर्क झाल्याने तीव्र विजेच्या धक्क्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 11 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान दापोली मंडणगड मार्गावरील भवानी मार्बल दुकानासमोर हा अपघात घडला. डंपरमधून माती रिकामी करत असताना वाहनाचा मागील भाग महावितरणच्या मुख्य वीज वाहिनीला लागला. यामुळे संपूर्ण डंपरमध्ये विद्युत प्रवाह पसरला आणि चालकाला जबरदस्त विजेचा धक्का बसला. या दुदैवी घटनेत मृत्यू पावलेले चालक अशफाक हुसेन आराई (वय 60 वर्षे) हे मूळचे ताडील गावचे असून सध्या दापोलीतील खोंडा परिसरात वास्तव्यास होते. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वाच मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
फोटो डिपी 31-03 याच डंपरचा स्पर्श विद्युत वाहिनीला झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू ओढावला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button