राजापुरात स्टेशनरी गोदामाला आग, मोठे नुकसान…


राजापुर शहरातील विनोद मनोहर पवार यांच्या मालकीच्या सुखकर्ता स्टेशनर्स अँड सप्लायर्स दुकानाच्या स्टेशनरी साहित्य गोदामाला आग लागून सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
शहरातील मुख्य रस्त्यावर पवार यांचे सुखकर्ता स्टेशनर्स अँड सप्लायर्स नावाचे स्टेशनरीचे दुकान आहे. तर लगतच असलेल्या शौचेवाड्यामध्ये असलेल्या स्वागत लॉजमध्ये त्यांचे विविध प्रकारचे स्टेशनरी साहित्य ठेवण्याचे गोदाम आहे. मंगळवारी दुपारी १२.३५ च्या दरम्यान अचानक या गोदामातून धूर येऊन मोठी आग लागल्याचे निदर्शनास आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button