मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पर्यटकांची कार पलटी झाल्याने अपघात, एकाचा मृत्यू


मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पर्यटकांची कार पलटी झाल्याने अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू झाला
तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात मध्यरात्री घडला जखमींवर चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे त्यामुळे याआधीही अनेक वेळा भीषण अपघात झाले आहेत संजय भंडारी (वय २८, रा. कांची, ता. नाशिक) हा आपल्या मित्रांसह महेंद्र हा एक्सयूव्ही ३०० या कारने गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी निघाला होता. परशुराम घाट परिसरात आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली.या अपघातात रोहित संतोष भालेकर (वय २८, रा. इंदिरानगर, नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा संपत आव्हाड (वय ३३, रा. चापडगाव, ता. निफाड), संदीप चंद्रभान डेरिंगे (वय ३६, रा. पळसे, नाशिक) तसेच चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले. जखमींना तत्काळ चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button