
चिपळूण विभागातील ठेकेदाराची साडेतीनशे कोटींची बिले रखडल्याने ठेकेदार आंदोलनाच्या तयारीत…
चिपळूण शहरासह खेड, दापोली, मंडणगड, गुहागर या पाच तालुक्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे करणार्या ठेकेदारांची अंदाजे साडेतीनशे कोटी रुपयांची बिले अडकली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या पाच तालुक्यातील शेकडो ठेकेदार अक्षरशः मेटाकुटीस आले असून वेळीच बिले मिळाली नाहीत दूर सर्व ठेकेदार मिळून मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत शहरासह रत्नागिरी मधील पाच तालुके येतात उत्तर रत्नागिरीत कोट्यवधींची विकासकामे झाली आहेत तर काही सुरू आहेत. झालेल्या कामांची बिले ३१ मार्चपूर्वी मिळणे अपेक्षित होते. मात्र निधी आला नसल्याने मार्च अखेरीस ठेकेदारांची बिले काढता आली नाहीत.
www.konkantoday.com



