
उड्डाणपुलाखाली भुयारी मार्ग नसल्याने लांजावासियांची होणार मोठी गैरसोय
लांजा शहर समन्वय समितीच्या पाठपुराव्यानंतरही लांजा तहसील कार्यालयासमोरील मुंबई-गोवा महामार्गावर उड्डाणपुलाखालून जाणार्या भुयारी मार्गाला (अंडरपास ब्रिज) मंजुरी मिळालेली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांसह नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार असून भविष्यातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होणार आहे.
शहरातील व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन कामकाजासाठी जास्त वर्दळीची ठिकाणे म्हणजे तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस ठाणे, तालुका पुरवठा विभाग, दुय्यम् निबंधक रजिस्टर ऑफिस, ग्रामीण रुग्णालय, माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, झेरॉक्स सेंदर तसेच सरकारी दस्तऐवज तयारे करण्याचे सेंटर ही होय. ही सर्व ठिकाणे जवळ होती. पण आता याठिकाणी अंडरपास न ठेवल्याने सर्व विभागले जाणार आहे.
या विभागणीने लांजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह इतर शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणार्या तालुक्यातील जनतेला ये-जा करण्यासाठी अडचणीचे ठरणार आहे. रहदारीचा विचार करता दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी उड्डाणपुलाखाली मार्ग असणे आवश्यक आहे. मात्र सध्या उड्डाणपुलाची भिंत उभारण्याचे काम याठिकाणी महामार्गाच्या दुतर्फा वेगाने सुरू असल्याने अंडरपास ब्रिजच्या मागणीला रेड सिग्नल मिळाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
www.konkantoday.com




