सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे बांधकाम व्यावसायिकाला शिकार करताना संपवलं, सुशांत दळवी मृत्यू प्रकरणाचं गूढ उकललं


  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे एका बांधकाम व्यवसायिकाचा बंदुकीच्या गोळीने हत्या करण्यात आल्याने वातावरण तापलं आहे. सुशांत जनार्दन दळवी (मूळ रा. कळसुली तालुका कणकवली) असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास दळवी यांचा मृतदेह कणकवली जवळ मुरे डोंगरी येथे मिळाला आहे. या घटनेचे वृत्त कळताच घटनास्थळी तात्काळ अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम, पोलीस उपविभाग अधिकारी घनश्याम आढाव आदी पोलीस अधिकारी तसेच तपास यंत्रणांची पथके घटनास्थळी दाखल झाली होती.
    अवघ्या काही तासात या हत्या प्रकरणाचा तपास करत ही हत्या दळवी यांचा मुकादम अमर सत्यवान कदम यानेच केल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. कुडाळ ओरस परिसरातील असलेल्या अमर कदमला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी अमर याने गोळी घालून हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुशांत दळवी व अमर कदम हे दोघेही शिकारीसाठी गेले होते. दळवी यांना शिकारीचा छंद होता. या घटनेनंतर अमर याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. मात्र, ही हत्या कोणत्या उद्देशाने केली? ते अद्याप समजू शकलं नाहीय. याचा कणकवली पोलीस तपास करत आहेत.
    घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button