संगमेश्वरमध्ये कुजलेल्या अवस्थेत प्रौढाचा मृतदेह


संगमेश्वर तालुक्यातील मारळ फाटा ते कळकदरा मार्गावरील झाडीझुडपात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली असून, तो आंगवली भगतवाडी येथील संतोष राजाराम अणेराव यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, मारळ गावचे पोलीस पाटील देवदास चंद्रकांत सावंत यांना गुरुवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास परिसरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली असता, रस्त्याच्या उजव्या बाजूच्या गवताळ भागात एका पुरुषाचा मृतदेह अत्यंत विदारक अवस्थेत आढळून आला.
मृतदेह डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे कुजलेला होता. मृताच्या अंगात राखाडी रंगाची पँट, काळपट टी-शर्ट, डोक्यावर लाल टोपी तसेच जवळच एक टॉवेल आढळून आला. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून मृताची ओळख संतोष अणेराव (वय ५२) अशी पटवली. या प्रकरणी देवरुख पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संतोष अणेराव यांच्या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button