’वाशिष्ठी’ नदी बनतेय प्रदूषणाचे आगर, चक्क रसायनयुक्त पिशव्यांची धुलाई


एकीकडे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या राज्यातील प्रदूषित नद्यांच्या यादीत चिपळूणच्या वाशिष्ठी नदीचा समावेश झाल्यानंतर हा मुद्दा गाजत असतानाच नदीत आता बेकायदा रसायनयुक्त पिशव्यांची बिनधास्तपणे धुलाई करण्याचा भंगार व्यावसायिकाचा प्रताप सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केला आहे. पिंपळी पढांबे परिसरातील या प्रकाराचे हिडीओ, फोटो हे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवूनही दोन दिवसांत कोणतीही कार्यवाही न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पिंपळी व पेढांबे परिसरातील नदीच्या पुढील भागातील पाण्यात भंगार व्यावसायिकांकडून रसायनयुक्त पिशव्या धुवून त्या उघड्यावर वाळत टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही महिला बिनधास्तपणे या पिशव्यांची धुलाई करून त्या पिशव्या नदीकाठावर सर्वत्र वाळत टाकल्या जात आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button