
जिल्ह्यातील हॉटेल उद्योग ’गॅस’ वर!
रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात गॅस सिलिंडरची कोणतीही टंचाई नसल्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी अलीकडेच जाहीर केले होते. मात्र, प्रशासनाचा हा दावा प्रत्यक्षात फोल ठरताना दिसत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी विशेषतः रत्नागिरी शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून यामुळे हॉटेल व्यवसाय पूर्णपणे कोलमडण्याच्या मार्गावर आहे.
सध्या कोकणात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रत्नागिरीतील हॉटेल्समध्ये जेवणासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असतानाच, दुसरीकडे किचन चालवण्यासाठी आवश्यक असलेला गॅस मिळणे कठीण झाले आहे. त्यातच भर म्हणजे येत्या दि. १३, १४ आणि १५ मार्च ज्यासाठी किमान ३ ते व्यावसायिक सिलिंडर एकाच वेळी लागतात अथा एन गर्दीच्या काळात सिलिडर उपलब्ध नसल्यामुळे ’लग्नसराईचा हा डोंगर दूस पार करायचा?’ असा उद्विग्न प्रश्न होटेल व्यावसायिकांनी उपस्थित केली आहे.www.konkantoday.com




