गुहागर पंचायत समिती सभापतीपदी प्रणव पोळेकर; उपसभापतीपदी निलेश सुर्वे बिनविरोध.

गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे प्रणव पोळेकर तर उपसभापतीपदी भाजपचे निलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोंडकारुळ गावचे सुपुत्र असलेले प्रणव पोळेकर हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांच्या सभापतीपदाच्या निवडीने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर भाजपचे निलेश सुर्वे यांची उपसभापतीपदी निवड झाल्याने महायुतीची ताकद पंचायत समितीत अधिक दृढ झाल्याचे मानले जात आहे.गुहागर पंचायत समितीत शिवसेना-भाजप महायुतीची सत्ता असून शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. विजयानंतर पोळेकर आणि सुर्वे यांनी अल्पावधीतच आपली कार्यक्षमता, नेतृत्वगुण आणि जनसंपर्क यामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.नूतन सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांच्यावर तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button