
रत्नागिरी नगर परिषद आवारात उभी असलेली शववाहिनी सडत चालली, मात्र नेमकी मालकी कोणाची हे गुलदस्त्यात
रत्नागिरी नगर परिषदेच्या आवारात शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग लिहिलेली शववाहिनी गेले अनेक महिने उभ्या अवस्थेत तशीच पडून आहे. एमएच १२ एक्सएम १८८७ या नंबरची ही शववाहिनी रत्नागिरी नगर परिषद आवारात उभी करून ठेवण्यात आली आहे. मात्र या शववाहिनीचा कोणताही वापर होत नसल्याने ही नवीन शववाहिनी सडत चालली आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता सदरची शववाहिनी ही रत्नागिरी शासकीय रूग्णालयाची असून ती शासनाकडून देण्यात आली आहे. मात्र या शववाहिनीवर आवश्यक असलेल्या चालक व अन्य तांत्रिक गोष्टीला निधी उपलब्ध नसल्याने ही शववाहिनी नगर परिषदेकडे देण्यात आली असल्याचे वृत्त आहे.
मात्र या सर्व प्रकरणात शासनाने दिलेले हे वाहन सडून जात असल्याने एकप्रकारे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसत आहे. रत्नागिरी नगर परिषदेन नव्याने सत्तेवर आलेल्या सत्ताधार्यांनी याबाबतीत लक्ष घालणे आवश्यक आहे या शववाहिनीची मालकी नेमकी कुणाची हेही स्पष्ट होणे आवश्यक आहे. शासनाच्या निधीतून उपलब्ध झालेली सेवा वाहिनी सडून जाण्यापेक्षा अन्य गरजू संस्थेकडे हस्तांतरित केले तर त्याचा उपयोग होणार आहे
www.konkantoday.com




