रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीतील केसर कंपनीच्या आवारात आगीची घटना


रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीतील केसर कंपनीच्या आवारात रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. कंपनीच्या मोकळ्या परिसरात अचानक आग लागल्याने काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले होते, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.आगीची माहिती मिळताच लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करत अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने ही आग वेळेत आटोक्यात आणण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button