मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर-माणगाव वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा मनस्ताप,


माणगाव व इंदापूर येथे शनिवारी (ता. 7) व रविवारी (ता. 8) सलग दोन दिवस प्रवासी व पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. याच मार्गावर वाकण नाका येथे तसेच कोलाड येथे देखील मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.इंदापूर ते माणगाव येथे सतत वाहतूक कोंडी होत आहे. या दोन्ही ठिकाणी बाह्यवळण मार्गाचे काम अनेक वर्षांपासून खोळंबले आहे. परिणामी इंदापूर व माणगाव या गावातूनच वाहने जातात. येथील अरुंद रस्ता असल्यामुळे दोन्हीकडचे वाहनांना जाण्यास अडथळा निर्माण होतो आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. शिवाय कोलाड या ठिकाणी फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. तिथे देखील कोंडी होते. वाकण नाक्यावर देखील तिन्ही बाजूने वाहने येत असल्यामुळे कोंडी होते.

शनिवारी व रविवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कालखंडात मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी असल्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने अधिसूचना जाहीर केली. पण याबाबत अंमलबजावणी केली नाही. कारण दोन्ही दिवस येथून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुरू होती. याचा त्रास प्रवासी व वाहन चालक आणि पर्यटकांना झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button