गुरुप्रसाद पटवर्धन, प्रथमेश घाटे, अथर्व घाणेकर तबला विशारद परीक्षेत उत्तीर्ण

गुरू केदार लिंगायत यांचे मार्गदर्शन

रत्नागिरी : येथील ‘स्वरनिनाद संगीत अकॅडमी’ आणि ‘रियाज तबला अकॅडमी’मध्ये तबल्याचे शिक्षण घेणारे गुरुप्रसाद पटवर्धन, प्रथमेश घाटे आणि अथर्व घाणेकर या विद्यार्थ्यांनी तबला विशारद परीक्षा अनुक्रमे प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली आहे.
याच अकॅडमी शिक्षण घेणारे गुरुप्रसाद लिंगायत, गंधार पाटणकर, कुणाल ठाकुरदेसाई, ऋग्वेद रेमणे, भाग्येश गुरव या पाच विद्यार्थ्यांनी उपांत्य विशारद परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. हे सर्व विद्यार्थी गेले दहा ते बारा वर्षे तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण गुरू केदार लिंगायत यांच्याकडे घेत आहेत.
रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक केदार लिंगायत यांच्याकडे सध्या मोठ्या संख्येने विद्यार्थी तबल्याचे धडे गिरवत असून, त्यांचे विद्यार्थी नामवंत कलाकारांसोबत तबला साथ करतानाही दिसतात.
दरम्यान, याआधीही स्वरनिनाद संगीत अकॅडमी आणि रियाज तबला अकॅडमीच्या आठ विद्यार्थ्यांनी विशारद पूर्ण पदवी प्राप्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button