कोलेवाडी सावंत विकास मंडळजिल्हास्तरीय पालखी नृत्य भव्य स्पर्धेचे आयोजन.

कोलेवाडी सावंत विकास मंडळ यांच्या विद्यमाने .
शनिवार दिनांक ०७ मार्च २०२६ रोजी रात्रौ ठिक ०९ (२१.००) वाजता जिल्हास्तरीय पालखी नृत्य भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.


स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास १० हजार रुपये द्वितीय क्रमांकास ०७ हजार तृतीय क्रमांकास ०५ हजार रुपये व प्रत्येकी चषक तसेच उर्वरित सहभागी संघाना रोख रक्कम ०२ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्र देण्यात येईल.
या स्पर्धांचे आयोजन गाव कोलेवाडी सावंतवाडी ग्रामदेवतेची सहाण येथे होणार आहेत.
स्पर्धेचे नियम : १) पालखी नृत्य स्पर्धा आखून दिलेल्या रिंगणातच घेतली जाईल.
२) पालखी नाचविताना पालखीचा कोणताही भाग जमिनीला टेकल्यास संघ स्पर्धेतून बाद ठरविला जाईल.
३) पालखी नाचविताना कोणत्याही स्पर्धकाचा पाय पालखीला लागल्यास संघ स्पर्धेतून बाद ठरविला जाईल.
४) स्पर्धेची एकूण वेळ २५ मिनिटे असेल (देखाव्यासाठी ५ मिनिटे, पालखी नृत्यासाठी २० मिनिटे.)
५) स्पर्धकांनी पालखीला स्पर्श केल्यानंतर पालखी नृत्याची वेळ चालू होईल.
६) देखावा हा पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक प्रबोधनात्मक असावा.
७) पालखी नृत्य स्पर्धक संख्या २१ किंवा २२ असेल (आयोजकांच्या सांगण्याप्रमाणे) प्रत्येक संघाने वेळेच्या अर्धा तास अगोदर हजर रहावे.
८) पंचाचा निर्णय अंतिम राहील.
९) स्पर्धेत आयत्यावेळी योग्यते काही बदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील.
अधिक माहितीसाठी
श्री . संदेश सावंत ९२७१७५६८४२
कु . अभिजित सावंत ८९८०६३३१४६
कु. सुहास सावंत ७०५७९६६१४५ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button