कोकण रेल्वेच्याकोकणकन्या आणि मांडवी या लोकप्रिय गाड्यांमध्ये नवीन “AC इकॉनॉमी डबे”


उन्हाळ्याच्या झळा सुरु झाल्यावर आता कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी आल्हाददायक माहिती दिली आहे.

कोकणकन्या आणि मांडवी या लोकप्रिय गाड्यांमध्ये अतिरिक्त एसी इकॉनॉमी डबा जोडल्याने प्रवाशांना आता अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दोन्ही गाड्यांमध्ये 3-टियर एसी इकॉनॉमीचा 1 कायमस्वरूपी अतिरिक्त डबा समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

CSMT-मडगाव 20111 गाडी 25 फेब्रुवारीपासून, तर 20112 मडगाव-CSMT सेवा 24 फेब्रुवारीपासून नव्या रचनेनुसार धावेल.
10103 आणि 10104 क्रमांकाच्या मांडवी एक्स्प्रेसमध्येही 25 फेब्रुवारीपासून सुधारित डब्यांसह प्रवासाची सोय उपलब्ध होईल.

वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून रेल्वेने घेतलेला हा निर्णय कोकण मार्गावरील नियमित प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

नवीन बदलांनंतर प्रत्येक गाडीत एकूण 23 आधुनिक एलएचबी डबे असणार आहेत.

फर्स्ट एसी, एसी-2 टियर, एसी-3 टियर, एसी-3 इकॉनॉमी, शयनयान आणि सामान्य डबे अशा सर्व प्रवाशांसाठी वेगवेगळ्या श्रेणी उपलब्ध राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button