केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही


मुंबई :- काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली.
काजू उद्योगाला आर्थिक बळकटी देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत काजू निर्यात धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र व राज्य शासन यांच्यात समन्वय साधून महाराष्ट्रातून काजूची निर्यात वाढविण्याबाबत धोरणात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश मंत्री श्री. नितेश राणे यांनी यावेळी दिले. काजू प्रक्रिया उद्योग, निर्यातदार व शेतकरी यांना अधिक लाभ मिळावा यासाठी आवश्यक त्या निर्णयांवर सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

या बैठकीस महाराष्ट्र काजू प्रक्रिया उद्योग (KCO) असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुरेश बोवलेकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या निर्णयामुळे सिंधुदुर्गसह कोकणातील काजू उद्योगाला चालना मिळून रोजगारनिर्मिती, निर्यातवाढ तसेच स्थानिक आर्थिक विकासाला बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button