
फेब्रुवारीकरिता अंत्योदय कार्ड धारकांसाठी तालुकानिहाय धान्य साठ्याचे वितरण
रत्नागिरी, दि. ६ ) : माहे फेब्रुवारी 2026 करिता जिल्ह्यातील 36 हजार 795 अंत्योदय कार्ड धारक सदस्यांकरिता अंत्योदय तांदूळ 675 मे.टन व गहू 517.50 मे.टन नियतनाची भारतीय अन्न महामंडळ पनवेल यांच्याकडून प्राधान्यची उचल कराण्यात आली आहे. माहे फेब्रुवारी 2026 करिता तालुकानिहाय धान्य साठ्याचे वितरण करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यानी कळविले आहे.
माहे फेब्रुवारी 2026 करिता मंडणगड तालुक्यात 1549 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 30.50 मे.टन तांदूळ तर 23 मे.टन गहू , दापोली तालुक्यात 3176 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 56.50 मे.टन तांदूळ तर 43.50 मे.टन गहू , खेड तालुक्यात 3877 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 70 मे.टन तांदूळ तर 52.50 मे.टन गहू, गुहागर तालुक्यात 3270 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 63.50 मे.टन तांदूळ तर 47.50 मे.टन गहू, चिपळूण तालुक्यात 5803 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 112 मे.टन तांदूळ तर 84 मे.टन गहू, संगमेश्वर तालुक्यात 7085 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 140 मे.टन तांदूळ तर 105 मे.टन गहू, रत्नागिरी तालुक्यात 4333 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 70 मे.टन तांदूळ तर 57 मे.टन गहू, लांजा तालुक्यात 3455 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 57 मे.टन तांदूळ तर 46 मे.टन गहू, राजापूर तालुक्यात 4247 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 75 मे.टन तांदूळ तर 59 मे.टन गहू चे वितरण करण्यात आले आहे.
माहे फेब्रुवारी साठी अंत्योदय कुटुंबातील लाभार्थ्यांकरिता धान्याचे वितरण प्रति कार्ड 35 किलो प्रमाणात करावयाचे असून त्यामध्ये अंत्योदय तांदूळ 20 किलो व गहू 15 किलो असे असेल.
000




