राज ठाकरेंचा गंभीर आरोप, “भाजपाने मुंबई, महाराष्ट्र आणि देश विकायला काढला आहे,


मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. तसंच मुंबईसह देश विकायाला काढला आहे असाही आरोप राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केला. मी आणि उद्धव एकत्र का आलो? याचं कारणही राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात सांगितली.

काय म्हणाले राज ठाकरे?

शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. या व्यासपीठावर मी अनेकदा बाळासाहेब ठाकरेंसह या व्यासपीठावर आलो. माझे वडील श्रीकांत ठाकरेही असायचे, आजोबा प्रबोधनकार ठाकरेही असायचे, आमची माँ देखील उपस्थित असायची. आज या क्षणाला दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही आज प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, माँ, माझे वडील असायला पाहिजे होते. हे चित्र मराठी माणसांसाठी आम्ही दोन भाऊ या ठिकाणी आलो आहोत हे ते बघत असतील.

२० वर्षांनी मी पहिल्यांदा युती केली कारण

२० वर्षांनी मी पहिल्यांदा युती करतो आहे. त्यामुळे या युतीच्या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकिटं दिली गेली, अनेकांना नाही देता आली, काहींना वाटलं की दुसऱ्या पक्षात जावं. या गोष्टी होतात, आमच्याही हातात या गोष्टी नव्हत्या. पण जे नाराज असतील त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आत्ता आहेत तेच कुठे जातील माहीत नाही त्यामुळे जे गेले आहेत ते परत येतील. असा टोलाही राज ठाकरेंनी एकत्र आलो.

मी आणि उद्धव एकत्र आलो कारण…

मी आणि उद्धव एकत्र आलो याचं कारण मुंबईवर आलेलं संकट. मी अनेक वर्षांपासून बोलत आलो, की कशा प्रकारे डाव रचला जातो आहे. हिंदी सक्तीचा विषय आणल्यानंतर मी पण कडाडलो. उद्धवही कडाडलो. मी त्याआधीच म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिकडून या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. हिंदी सक्तीचा विषय फक्त तुम्हाला चाचपडून बघण्यासाठी होता. मराठी माणूस जागा आहे का? हे फक्त चाचपडणं होतं. २०२४ नंतर म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर या सरकारला फेफरं आलं. जे काय हवं ते करायला लागले. इतकी हिंमत आली कुठून? कुणाला विचाराचंय नाही काही नाही, आम्हाला वाटलं की आम्ही केलं. पैसे फेकले की जनतेला विकत घेऊ हा आत्मविश्वास आला कुठून? असा सवाल राज ठाकरेंनी केला. काँग्रेसचीही सत्ता होती. पण जनतेला घाबरुन होते, पण आता घाबरणं वगैरे काहीच नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सरकारला मुंबईसह देश विकायचा आहे-राज ठाकरे

या सरकारचा उद्दामपणा कुठे गेला ? अकोटमध्ये भाजपाने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये काँग्रेसशी युती केली. ६६ जण बिनविरोध निवडणूक झाली. तिथे मतदानाचा अधिकारच काढून घेतला गेला. वाईट या गोष्टीचं वाटतं की लोक विकले जातात. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा माणूस ड्रग रॅकेटमधला माणूस त्याला भाजपाने तिकिट दिलं. तुषार आपटे हा बलात्काराच्या केसमधला आरोप त्याला भाजपाने नगरसेवक केलं. लहान मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला माणूस त्याला नगरसेवक केलं. आली कुठून ही हिंमत? वेड्या वाकड्या पद्धतीने निवडणूक जिंकण्याचं तंत्र समजतं तेव्हा मस्ती आणि माज येतो. अख्खी मुंबई, महाराष्ट्र आणि देश विकायला काढला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button