रत्नागिरी जिल्ह्यातील २० हजार शेतकर्‍यांना मिळाली अवकाळीची भरपाई


ऑक्टोबर महिन्यात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकर्‍यांना बसला होता. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेल्या २० हजार ८११ शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर आता थेट नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली आहे. एकूण ३ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपयांच्या निधी वाटपास प्रशासनाने पूर्णत्व दिले आहे.
गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यात पावसाने सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यामुळे भात आणि नाचणीचे पीक जोमात होते. मात्र कापणीच्या ऐन हंगामातच अवकाळी पावसाने घात केला. अनेक ठिकाणी उभे पीक आडवे झाले तर काही ठिकाणी भाताला मोड फुटले. यामुळे शेतकरी पूर्णपणे खचला होता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button