परिवहन अनुज्ञप्तीधारकांकरिता मोफत नेत्रतपासणी शिबीर


रत्नागिरी, दि. १३ ):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ३७ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत परिवहन संवर्गाची अनुज्ञप्ती धारकांकरिता (परिवहन लायसन्सधारक) आठ दिवस मोफत नेत्रतपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परिवहन अनुज्ञप्तीधारकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.
१५ जानेवारी २०२६ रोजी, १९ जानेवारी ते २२ जानेवारी २०२६ आणि २७ जानेवारी ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण ठिकाण, हातखंबा ट्रॅक येथे या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button