न.प.च्या आर्थिक बोजामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी नाकारल्या शासकीय सुविधा


रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी आपल्या पदाची धुरा हाती घेतल्यानंतर अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत नगर परिषदेवर मोठा आर्थिक बोजा आहे. याचे भान राखत सुर्वे यांनी कोणत्याही शासकीय सेवासुविधांचा लाभ घेणार नाही असा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
शिल्पा सुर्वे यांनी आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. याचे पहिले पाऊल म्हणून त्यांनी नगराध्यक्षांसाठी राखीव असलेल्या शासकीय गाडीचा वापर पूर्णपणे थांबवला आहे. सध्या त्या परिषदेच्या सर्व कामांसाठी स्वतःच्या गाडीचा वापर करत आहेत. नगर परिषदेचा इंधन आणि देखभालीचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अनावश्यक खर्च टाळणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शहराच्या सौंदर्यासह स्वच्छतेच्या मुद्याला सुर्वे यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले स्वच्छतेचे सुयोग्य आहे. नियोजन करून त्यांनी प्रत्येक प्रभागात ५ स्वच्छता कर्मचारी नियुक्त केले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत न.प.च्या कारभारातील शिस्त काहीशी बिघडली होती. ही शिस्त पुन्हा आणण्यासाठी सुर्वे यांनी कंबर कसली आहे. फाईल्सचा निपटारा करण्यापासून ते कर्मचार्‍यांच्या उपस्थितीपर्यंत सर्वच बाबतीत पारदर्शकता आणि शिस्तीचां कारभार राबवला जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button