
खेड तालुक्यातील आंबडसमध्ये गुरांची वाहतूक करणारी पिकअप व्हॅन पकडली
खेड तालुक्यातील आंबडस बसथांब्याजवळ येथील पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरांची वाहतूक करणार्या बोलेरो व्हॅनसह तिघांना रंगेहाथ पकडले.
४ लाख रुपये किंमतीच्या व्हॅनसह ४ गुरे असा ४ लाख ९० हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. सोमवार २९ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
संजू राजू साळुंखे (३१), रोहन अंकुश साळुंखे (२१, दोघे रा. हिंगणगाव बुद्रूक सांगली) संजय गंगाराम चव्हाण (३४, रा. आंबडस-खेड) अशी संशयितांची नावे आहेत.
हे तिघेजण विनापरवाना गुरांची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला त्यानुसार बोलोरे पिकअपमधील (एमएच ५० एन ५४७६) पाठिमागील हौद्यात ४ गुरे आढळून आली. गुरांना क्रूरपणे बांधून नेत असताना पोलिसांनी शिताफीने तिघांनाही जेरबंद केले.www.konkantoday.com




