
दापोली तालुक्यात आलेल्या पर्यटनासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा दुर्देवीरित्या मृत्यू
पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे घडली आहे. दापोली तालुक्यात आलेल्या पर्यटनासाठी आलेल्या 13 वर्षीय मुलीचा दुर्देवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आंचल मदन सकपाळ (वय वर्ष 13) असे या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. ठाण्यातील कल्याण परिसरातून हे कुटुंब 25 डिसेंबर रोजी दापोली येथे पर्यटनासाठी आले होते.गेले तीन-चार दिवस दापोली परिसरात पर्यटनाचा आनंद घेतला हे कुटुंब आज शनिवारी 27 डिसेंबर रोजी परतीच्या प्रवासाला निघणार होते. आंजर्ले परिसरातील एका रिसॉर्ट मध्ये हे कुटुंब थांबले होते. सकाळी निघायचं असल्याने ते आपली मुलगी आंचल हिला उठवण्यासाठी गेले मात्र मुलगी उठलीच नाही. शिवाय तिचे शरीर थंडगार पडल्याचे व दातखिळी बसल्याचे त्यांच्या लक्षात आलं. यावेळी कुटुंबियांनी तात्काळ स्थानिकांच्या मदतीने आंजर्ले येथील जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. तेथून तातडीने तिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले. यावेळी दापोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंचल हिला तपासून मृत घोषित केले.



