
दापोली येथील हर्णै बंदरात मोठ्या प्रमाणावर मच्छीची आवक, खरेदीसाठी पर्यटकांनी फुलले हर्णै बंदर
हर्णे गेले काही दिवस कमी झालेली कोळंबी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात मिळू लागल्याचे दिसत असून कोळंबी खरेदीसाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे हर्णे बंदर कोळंबीचे टफ आणि पर्यटकांनी फुलून गेले होते. दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात पुन्हा एकदा कोळंबीची आवक वाढली असून लिलावातील उलाढातील तेजी आलेली दिसत आहे. त्यातच ’आता मार्गशीर्ष उपवास संपल्यामुळे मासळीची मागणीही वाढली आहे.
डिसेंबर महिन्यात पर्यटकांची संख्या वाढत असते. आताही दापोली तालुक्यात पर्यटकांनी मोठी प्रमाणात हजेरी लावायला सुरुवात केली आहे. हे पर्यटक ताज्या मासळीसाठी ह बंदराला आवर्जून भेट देतात. हर्णे बंदरात मोठ्या प्रमाणात पर्यटक मासळी खरेदी करत होते. दरम्यान गेले चार दिवसापासून कोळंबीची आवक वाढल्याने लिलावात काळंबी आणि खरेदीसाठी आलेल्या पर्यटकांमुळे हर्णे बंदर फुललेले दिसत होते.www.konkantoday.com



