
निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप च्या गेल्या दोन वर्षाच्या पाठपुराव्याला मोठे यश!
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात दोन एक्स्प्रेसना थांबे मंजूर!
गाडी क्रमांक 20910/20909(साप्ताहिक) :-
पोरबंदर कोचीवेली सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि 19577/19578 (द्वि साप्ताहिक) जामनगर तिरुनलवेली एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांना संगमेश्वर रोड हा थांबा रेल्वे बोर्डाने मंजुर केला आहे.
गेली दोन वर्षें संगमेश्वर रेल्वे स्थानकात या गाडयांना थांबा मिळावा म्हणून निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर (रेल्वे) ग्रुप मागणी करत होता. यासाठी त्यांनी अनेकवेळा रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार, भेटीगाठी, आंदोलने,उपोषण असे विविध मार्ग वापरून ही मागणी लाऊन धरली होती. आजवर केलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे रेल्वे बोर्डाने या गाडयांना अखेर संगमेश्वर येथे थांबा मंजूर केल्याने आज त्यांच्या मागणीला यश आल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्रालय, मा. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे, मा. खासदार नारायण राणे सर , मा.आमदार शेखर निकम , स्थानिक लोकप्रतिनिधी, या सर्वानी याकामी दिलेल्या सहकार्य व पाठिंब्यासाठी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुक (रेल्वे) ग्रुपच्या वतीने मनापासुन आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
संघर्षाच्या काळात भक्कम पाठबळ दिलेल्या संगमेश्वर तालुक्यातील तळागाळातील रेल्वे प्रवाशी, जनता,हितचिंतक यांचे देखील संघटनेच्या वतीने मनापासुन आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
संघटनेचे प्रमुख संदेश जिमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे
तालुक्यातील रेल्वेप्रवाशी आणि जनतेकडून अभिनंदन करण्यात येत आहे. तीन वर्षांपूर्वी नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा मिळवल्यानंतर आता या गाडयांच्या थांब्यांची मागणी पुर्ण झाल्याने आपण आंनदीत असुन येत्या २६ डिसेंबर २०२५ रोजी संगमेश्वर रेल्वे स्थानकात निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप तर्फे जल्लोषात स्वागत करण्यात येणार अस्सल्याचे सांगत त्याची लवकरच सवी स्तर रूपरेषा जाहीर करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.




