
कोंबडीच्या पिल्लाला चार पाय; पाहण्यासाठी पंचक्रोशीत गर्दी
मंडणगड तालुक्यातील पालवणी, दत्तनगर येथे निसर्गाच्या एका अनोख्या किमयेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. येथील सौ. शकुंतला सुरेश जोशी यांच्या घरात पाळलेल्या कोंबडीला चक्क चार पायांचे पिल्लू जन्माला आले आहे. सामान्यतः दोन पाय असणार्या कोंबडीच्या – पिल्लाला चार पाय असल्याचे निदर्शनास – येताच परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा दुर्मिळ प्रकार पाहाण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने जोशी यांच्या घरी भेट देत आहेत. काही जण मोबाईलमध्ये फोटो-व्हिडिओ टिपून ही घटना पाहाण्याचा अनुभव घेत आहेत.
www.konkantoday.com




