
मुंबई गोवा महामार्गांवर अपघाताची मालिका सुरूच ,तुरळ येथे वाहन चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावर अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत
आज संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गणपतीपुळे येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे.
अपघातग्रस्त वाहन ब्रेझा (क्रमांक एमएच 04 जेव्ही 7198) ही भरधाव वेगात येत असताना वाहनाने रस्त्यालगत असलेली साईड गार्ड तोडून रस्ता सोडून गाडी बाहेर कोसळली गाडीचा अर्धा भाग रस्त्याखाली गेला या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे




