
बनावट इन्स्टाग्रामद्वारे मुलांचे आक्षेपार्ह फोटो अपलोड अपलोड करणार्या संशयितावर गुन्हा दाखल
इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर बनावट अकाऊंट तयार करून त्याद्वारे एका अनोळखी मुलाचा आक्षेपार्ह फोटो अपलोड करून तो प्रसारित केल्याप्रकरणी एका संशयितावर गुरूवारी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार २३ डिसेंबर २०२२ रोजी घडला. त्यात संशयित व्यक्तीने इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर बनावट अकाऊंट तयार केले. तसेच फोटो अपलोड करून तो प्रसारित केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी त्या संशयितावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.www.konkantoday.com




