
चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य श्रीकांत जोशींकडून १ हजार कि.मी.ची ’राईड’ पूर्ण
ऑडाक्स इंडिया रैंडोनिअर्स संलग्न सह्याद्री रँडोनिअर्सतर्फे आयोजित १ हजार कि.मी. बीआरएम राईड यशस्वीपणे पूर्ण करण्याचा मान चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य श्रीकांत जोशी यांनी मिळवला आहे. वयाच्या ५६व्या वर्षी त्यांनी ही आव्हानात्मक स्पर्धा पार पाडली. त्यांच्या समवेत कराड येथील रविराज जाधव व चंद्रजित पाटील यांनीही सहभाग घेतला.
ऑडाक्स अंतर्गत २००, ३००, ४००, ६०० आणि १००० कि.मी.च्या बीआरएम राईड्स ठराविक वेळेत पूर्ण कराव्या लागतात. यामध्ये रायडरची शारीरिक क्षमता, मानसिक ताकद आणि शिस्त यांची कसोटी लागते. १ हजार कि.मी. साठी ७५ तासांची मर्यादा असते. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत विविध बीआरएम पूर्ण केल्यानंतर रायडर ’सुपर रैंडोनिअर’ किताबासाठी पात्र ठरतो.
जोशी यांनी यापूर्वीच हा किताब पटकावला असून १ हजार कि.मी. बीआरएम पूर्ण करून त्यांनी आपल्या यादीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे, जोशी यांनी आपल्या यशाचं श्रेय चिपळूण सायकलिंग क्लबमधील सदस्यांच्या प्रोत्साहनाला दिलं.www.konkantoday.com




