
कोकणात जिल्हास्तरीय स्पर्धेत कोहीनूर कॉलेजचा विजयी डंका
रत्नागिरी…खाद्यपदार्थ, मॉकटेल ड्रिंक्स तयार करणे, टॉवेल आर्ट्स,नॅपकिन फोल्ड, क्विझ अशा विविध १५ हॉस्पिटॅलिटी विषयांवर २ दिवस चालणारी मॅरेथॉन जिल्हास्तरीय स्पर्धा पाटकर वर्दे कॉलेज सॅटेलाईट सेंटर, पिंगुळी ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण १७ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.या मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कोहिनूर कॉलेज ऑफ हॉटेल ॲन्ड टुरिझम मॅनेजमेंट स्टडीज, रत्नागिरी यांनी पटकाविले.
या स्पर्धेत १५ विविध स्पर्धांपैकी पैकी १३ स्पर्धेत कोहिनूर कॉलेज ने बाजी मारली.या मध्ये ३ सुपर गोल्ड(समीक्षा सावंत,पार्थ लिंगायत,अनुष्का मोरे),४ गोल्ड(नीलम मिरजूळकर, सनोबर केळकर, ऐश्वर्या आचरेकर, मुक्ता शेंबेकर)४ सिल्व्हर(आर्यन भोजे , रफिक मुल्ला, आर्या गायकवाड , साबीर नाकाडे,)आणि २ ब्रॉंझ मेडल(कुणाल खेडकर, समीक्षा सावंत) ह्या विद्यार्थ्यांनी मेडल्स पटकावून या स्पर्धेत एकत्रित प्रथम क्रमांक पटकावला.या विद्यार्थ्यांना मा .श्रीमती श्रुती कोकणे(प्राध्यापक), प्रा.श्री स्वप्नील मयेकर आणि कुलिनरी प्रा.श्री गौरव दिक्षित,प्रा. निकुंज राणा, वसिक मुकादम (टीम कॅप्टन)यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कोहिनूर कॉलेज ऑफ हॉटेल ॲन्ड टुरिझम मॅनेजमेंट स्टडीज रत्नागिरी कॉलेज तर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. तसेच आपल्या कोकणातल्या विद्यार्थ्यांना असेच उच्च दर्जाचे मार्गदर्शन देण्याचा सार्थ अभिमान आणि भविष्यात विद्यार्थ्यांकडून अशीच उत्तरोत्तर प्रगती होईल असा मानस कोहिनूर कॉलेज ऑफ हॉटेल ॲन्ड टुरिझम मॅनेजमेंट स्टडीज रत्नागिरी कॉलेजच्या प्राध्यापकांनी व्यक्त केला.




