
राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीत खाते उघडले ,भाजपच्या रेखा राजन चौधरी यांची बिनविरोध निवड
राज्यात भाजपने महापालिका निवडणुकीत खाते उघडले असून निकालाआधीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या यांच्या विशेष प्रयत्नांना यश आले आहे
भाजपच्या रेखा राजन चौधरी या नगरसेविकेची बिनविरोध निवड झाली आहे
रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत
रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय असल्याची प्रतिक्रिया
भाजप कडून व्यक्त करण्यात आली आहे
भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या चौधरी या जिल्हाध्यक्ष आहेत
कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रभाग क्रमांक १८ अ मधून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे
त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने उघडले खाते उघडले आहे
प्रभाग क्रमांक १८ अ मधून रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज आला होता
कुठलाही अतिरिक्त अर्ज न आल्याने रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे




