
रत्नागिरी शहरातील मारुती आळी झाली गुळगुळीत
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या आधीपासूनच रत्नागिरीतील रस्ते गुळगुळीत होण्यास सुरुवात झाली होती शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या राम आळी ,गोखले नाका आदी भागाचे डांबरीकरण आधीच झाले होते मात्र शहरातील मारुती आळी भागातील रस्त्यांवर खड्डे तसेच होते मात्र आज रत्नागिरी शहरातील मारुती आळी भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले त्यामुळे नागरिकांना या आता तुळतुळीत व गुळगुळीत रस्त्यावरून जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे




