मातोश्रीवरून समज देण्यावरून आ. भास्कर जाधव यांनी केला खुलासा


शिवसेना ठाकरे गटाचे नेते आ. भास्कर जाधव यांनी चिपळूण पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे त्यांना मातोश्रीवरून्च समज देण्यात आल्याचे वृत्त येथे पसरले असून या वृत्ताला ’कोणीही दुजोरा दिलेला नाही. शनिवारी सकाळी मुंबईमध्ये शिवसेना नेते खा. अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद झाली. तेव्हा त्यांना भास्कर जाधव यांच्याशी संबंधित प्रश्न विचारल्यावर हा प्रश्न माझ्या अखत्यारीत येत नाही. पक्षप्रमुख नेहमीच दक्ष असतात असे मोघम उत्तर त्यांनी दिले. तसेच रत्नागिरीमध्ये आमदार भास्कर जाधव यांनाही पत्रकारांनी याबाबत छेडले असता आपल्या नेहमीच्या शैलीत त्यांनी आम्ही काही चूक केली असेल आणि मातोश्रीने समज दिली असेल तर शिवसैनिक म्हणून त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे स्पष्ट केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button