दाभिळ खाडीमध्ये बेकायदेशीररित्या वाळू उपसा सुरूच


गेले अनेक महिने दाभिळ खाडीमध्ये राजरोसपणे सक्शन पंपाद्वारे उत्खनन सुरू असून यावर महसूल विभागाने वरदहस्त ठेवल्याचे बोलले जात आहे. सर्वत्र अनधिकृत वाळू व्यवसाय बंद असताना दापोली तालुक्यातील दाभिळ खाडीमध्ये राजरोस सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा सुरू असल्याने महसूल विभागाचा पोटचेपा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सायंकाळी ४ च्या सुमारास दाभिळ बीएसएनएल टॉवरच्या डोंगर आडोशा३५ ते ४० डंपर येवून थांबतात व फोनद्वारे यंत्रणा हलवत एकेक डंपर खाडीकिनारी जावून तिथून पसार होतात, असा खेळ पहाटे ५ वाजेपर्यंत रोज चालू असतो. याची चर्चा संपूर्ण दाभिळ परिसरात होत असतानाच महसूल विभागाचे स्थानिक प्रशासन मात्र अनभिज्ञ का? असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. रात्री अपरात्री धावणारे डंपर यामुळे या परिसरातील नागरिक संतापलेले आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button