
जागतिक ध्यान दिनानिमित्त रत्नागिरी आणि चिपळूण येथील मुख्य टपाल कार्यालयांमध्ये नित्या प्राणिक हीलिंग सेंटर तर्फे ध्यान सत्राचे यशस्वी आयोजन
जागतिक ध्यान दिनानिमित्त रत्नागिरी आणि चिपळूण येथील मुख्य टपाल कार्यालयांमध्ये ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. योग विद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन यांच्यावतीने रत्नागिरी येथे स्थित नित्या प्राणिक हीलिंग सेंटर तर्फे हे ध्यानसत्र घेण्यात आले. याकरता नित्या प्राणिक हिलिंग सेंटर रत्नागिरीतर्फे रत्नागिरी टपाल कार्यालयात अश्विनी शेलार, अमोल मोरे, आरुषी गावडे,नितीन गावडे, मयूर, आरती दप्तरदार यांनी तर चिपळूण येथे नित्या प्राणिक हीलिंग सेंटरचे प्रमुख तेजस महागावकर आणि सचिन गुरव यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. हा कार्यक्रम सकाळी साडेआठ ते साडेदहा वाजेपर्यंत घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी चिपळूण हेड पोस्ट ऑफिस आणि रत्नागिरी हेड पोस्ट ऑफिस यांचे मान्यवर आणि स्टाफ उपस्थित होता, या दोन्ही कार्यक्रमाला साधारण १२० लोकं उपस्थित होती. नित्या प्राणिक हीलिंग सेंटर तर्फे रत्नागिरीतील मारूती मंदिर दामले हायस्कूलजवळील सेंटरमध्ये प्राणिक हीलिंगचे विविध कोर्स आयोजित केले जातात. गेल्या दोन वर्षात अनेक लोकांनी त्याचा फायदा घेवून आपले जीवनमान उंचावले आहे. नित्या प्राणिक हीलिंग सेंटरतर्फे विविध शाळांमध्ये ध्यान शिबिर आयोजित केले जातात. तर संस्थेच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गरजू संस्थांना अन्न, कपडे स्वरूपात मदत केली जाते.www.konkantoday.com




