
चिपळूण-कराड राष्ट्रीय मार्गावरील कुंभार्ली घाटाची दुरुस्ती करा; अन्यथा आंदोलन
चिपळूण-कराड राष्ट्रीय मार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. या भागातील सोनपात्र परिसरातील अवघड वळण तर मृत्यूचा सापळाच बनले आहे. चढ-उताराच्या या वळणावर मोठ-मोठे खड्डे पडले असून दरदिवशी या ठिकाणी ट्रक पलटी होण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत. येत्या काही दिवसात या मार्गावर दुरुस्तीसह उपाय योजना न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा थेट इशारा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाला दिला आहे.www.konkantoday.com




