चिपळूणमध्ये कळंबस्ते गावच्या हद्दीत गोवा बनावटीची 1.68 लाखांची दारू जप्त


चिपळूण शहरानजीक कळंबस्ते गावच्या हद्दीत कळंबस्ते-धामणंद रस्त्यावर रेल्वे फाटकाजवळ एका वाहनात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचे मद्य असल्याची खबर मिळाल्याने उत्पादन शुल्क खात्याने कारवाई करत तब्बल 2 लाख 58 हजार 960 रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी प्रवीण गणपत तांबिटकर (रा. वालोपे तांबिटकरवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.या कारवाईमध्ये गोलन एस्‌‍ व्हिस्की (गोवा राज्यनिर्मित) या नावाचे 750 मिलीचे 22 बॉक्स 264 बाटल्या (रु.1,68960), 90 हजारांची एक मारुती 800 गाडी (एमएच-04-एएक्स-7050) असा एकूण 2 लाख 58 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button