
20 दिवसांपूर्वीच विकत घेतली थार, ताम्हिणी घाटातील 500 फूट खोल दरीत कोसळली, भीषण अपघातात चौघे ठार
पुण्याहून कोकणाकडे जाताना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात एक भीषण अपघात झाला. या अपघातात काळ्या रंगाची थार गाडी ताम्हिणी घाटातील 500 फूट खोल दरीत कोसळली आणि याच दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच, घटनास्थळी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि रेस्कू पथक दाखल झाले. हा भीषण अपघाताची माहिती 19 नोव्हेंबर रोजी मंगळवारी समोर आली. केवळ 20 दिवसांपूर्वीच ही कार विकत घेतली होती, पण काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि अनर्थ घडला.
रायगड़ जिल्ह्यातील ताम्हिणी घाटातील 500 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. महत्त्वाची बाब म्हणजे अशी की, या कारला विकत घेऊन अवघे 20 दिवस पालटून गेले होते. ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला होता. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे.
या अपघातात बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्याच नातेवाईकांची चौकशी केली असता. त्यांचे लोकेशन रायगड आणि पुणे या जिल्ह्यांना जोडलेल्या ताम्हिणी घाटात सापडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर शोधमोहिम सुरु केली असता, चौघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. पण, यात अजून दोन जणांचे मृतदेह बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच सह्याद्रीकडे वन्यजीव सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमकडून अपघातातील बेपत्ता झालेल्या दोघांचा शोध घेणं सुरु आहे.




