
भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नारायण राणे यांच्यासह बड्या नेत्यांचा समावेश
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. आता भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नारायण राणे यांच्यासह बड्या नेत्यांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यात दोन डिसेंबरला नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निवडणुकीची मतमोजणी आहे. दरम्यान राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. भाजपकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, नारायण राणे, पीयूष गोयल, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांचा समावेश आहे.www.konkantoday.com




