
मुरुड जंजिरा – काशीद समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या अकोल्यातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू…
रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या अकोल्यातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. तीन शिक्षक १२ विद्यार्थ्यांसह सहलीसाठी आले होते.काही विद्यार्थी काशीद येथील समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेले होते. पोहताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तीन विद्यार्थी बुडाले. यावेळी
वाचवण्यासाठी मदतीचा धावा करत गटांगळ्या खाऊ लागले आणि क्षणार्धात दिसेनासे झाले. यातील आयुष बोबडे या विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आले. आयुष रामटेके व राम खुटे अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. बचावलेल्या आयुष बोबडेवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. सहलीच्या सुरुवातीच्या हंगामात अशी दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




