
रत्नागिरीतील कारवांचीवाडी पारसनगर येथे एका आईनेच आपल्या आठ महिन्यांच्या मुलीची तोंडात गोळा कोंबून केली हत्या
रत्नागिरीतील कारवांचीवाडी पारसनगर येथे एका आईनेच आपल्या आठ महिन्यांच्या मुलीची काल सायंकाळी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं असून, मृत बालिकेचं नाव हुरेन आसिफ नाईक आहे.तिचा मृतदेह रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथील एका तरुणीचा विवाह चिपळूणजवळच्या गावातील तरुणासोबत झाला होता. या दाम्पत्याला आधीच एक चार वर्षांची मुलगी आहे. पती कामानिमित्त परदेशात असल्याने संबंधित महिला आपल्या माहेरी, कारवांचीवाडी येथे राहत होती. तिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू होते.बुधवारी सायंकाळी तिची बहीण कामानिमित्त बाहेर गेली असताना, या महिलेने आठ महिन्यांच्या हुरेनच्या तोंडात ओढणीचा बोळा कोंबला. त्यामुळे गुदमरून बाळाचा मृत्यू झाला. शेजारचे नातेवाईक घरी आल्यावर ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने बाळाला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.




